यावल शहरातील हरीओम नगरातून चोरट्यांनी महागडी कार लांबवली
Thieves stole an expensive car from Hariom Nagar in Yaval city यावल : यावल शहरातील फैजपूर रोडवरील विस्तारित भागातील हरीओम नगरातून घराबाहेर लावलेली कार चोरट्यांनी लांबवली. कार चोरीचा प्रकार गुरुवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कार चोरीने वाहनधारकांमध्ये घबराट
यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर विस्तारीत भागात हरीओम नगर आहे. या हरी ओम नगरातील रहिवासी शरीफ गुलशर तडवी यांच्या घराबाहेर प्रमोद धनसिंग पाटील (हिंगोणा) यांनी आपली व्हीस्टा कंपनीची कार (क्रमांक एम.एच. 39 डी. 1842) ही लावली होती. घराबाहेर लावलेली ही कार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी निदर्शनास आला. प्रारंभी दोन दिवस सर्वत्र कारचा शोध घेण्यात आला मात्र कार कुठेच मिळून न आल्याने की यावल पोलीस ठाण्यात प्रमोद पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.

