डोंगरकठोरा शेत-शिवारातून शेत विहिरीवरील सौर ऊर्जेच्या सोलर प्लेट लांबवल्या


Solar panels of solar energy on farm wells extended from Dongarkathora Farm-Shiwar
यावल :
यावल तालुक्यातील डोंगरकोठारा शेत-शिवारात शेत-विहिरीवर विहिरीच्या पंपासाठी लावलेल्या सौर ऊर्जेच्या सोलर प्लेट चोरी चोरट्यांनी लांबवल्या. शासकीय योजनेतून प्राप्त झालेल्या विहिरीवरील दोन सोलर प्लेट चोरी झाल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीमुळे उडाली खळबळ
डोंगरकठोरा शेत-शिवारामध्ये हमीद फकीरा तडवी (रॉयल अपार्टमेंट, ब्लॉक नंबर 6, तापी नगर, भुसावळ) यांचे शेत गट क्रमांक 1127/1 आहे. यामध्ये त्यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय अंतर्गत योजनेतून मिळालेल्या सौरऊर्जेच्या सोलरच्या दोन प्लेट लावल्या होत्या. याद्वारे विहिरीतील पंपाला विद्युत पुरवठा होत होता. व्हीटेक कंपनी, नागपूर या नावाच्या 18 हजार रुपये किंमतीच्या या दोन्ही सोलर प्लेट अज्ञात चोरट्याने चोरी केल्या. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात हमीद तडवी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !