महाराष्ट्रावर आज व उद्या अवकाळी पावसाचे संकट


Unseasonal rain crisis over Maharashtra today and tomorrow मुंबई  : सोमवारी राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानंतर मंगळवारीदेखील राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यासह देशात पावसाने हजेरी लावली आहे मात्र त्यामुळे शेतकर्‍यांची त्यामुळे दाणादाण उडाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

मंगळवारी पुन्हा अवकाळीचे संकट
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी व बुधवार, 28 रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल. याचदरम्यान काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

या जिल्ह्यात होणार पाऊस
आयएमडीने जारी केलेल्या अंदाजनुसार, मंगळवारी व बुधवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.


कॉपी करू नका.