जळगावात सुरक्षा रक्षकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
Security guard dies due to electric shock in Jalgaon जळगाव : जळगावातील 30 वर्षीय खाजगी सुरक्षा रक्षकाचा विजेचा जोरदार धक्का लागल्याने मृत्यू ओढवला. मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संदीप हिरामण भालेराव (38, रा.वाघ नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
इलेक्ट्रीक मोटारीचा बसला जबर शॉक
जळगाव शहरातील वाघ नगर परिसरात संदीप भालेराव हा तरुण आपल्या आई, पत्नी, दोन मुलांसह वास्तव्याला होता. सिक्युरीटी गार्डची खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता वाघ नगर परिसरात पिण्याचे पाण्याचे नळ आले असता यावेळी संदीप व त्यांची आई घरी होते. संदीपने पिण्याचे पाणी भरण्यासाठी ईलेक्ट्रीक मोटार सुरू केली असता त्यास विजेचा जबर धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परीसरातील नागरीकांनी धाव घेवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, संदीपच्या वडीलांचे आधीच निधन झालेले आहे त्यात आई दिव्यांग आहे. घरातील कर्ता पुरूष गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

