ही तर राज्य सरकारची दडपशाही : मनोज जरांगे-पाटील


This is oppression by the state government: Manoj Jarange-Patil छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र अशांत करू नका, माझ्यावर दबाव आणू नका, मी राजकीय टीका केलेली नाही पण ते राजकारणी आहेत. मी दहा टक्क्यांचे आरक्षण स्विकारले तर मी चांगला आणि नाही स्विकारले तर याला गुंतवा, अशी यांची भूमिका आहे. त्यामुळे माझा संयम सुटला, असे मराठा समाजोचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. राज्य सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोपही त्यांंनी केला.

फडणविसांना दिला हा इशारा
मराठा समाजाच्या बाबत फडणवीसांच्या मनात द्वेष आहे, मला जेलमध्ये टाकले तर, त्यांना दिसेल मराठा समाज काय असतो ते, जसा कापूस फुटल्यानंतर संपूर्ण शेत पांढरं दिसते तसे सर्वत्र मराठेच -मराठे दिसतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

समाजाचा हार होवू देणार नाही
मी मराठा समाजाची हार होऊ देणार नाही. मला जेलमध्ये टाकलं तर माघारी येऊन पुन्हा लढेल. फडणवीससाहेब नादी लागू नका. तुमच्या मागे आमदार आहेत या भ्रमात राहू नका, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.सरकारने शिष्टमंडळ पाठवून आमची फसवणूक केली आहे. आज देऊ, उद्या देऊ, अशी आश्वासने आम्हाला देण्यात आली होती. यामध्ये राज्याचे मंत्री, अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आहेत. या सर्वांवर आम्ही महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करू. आम्हाला जर ते कायदेशीर कचाट्यात घेणार असतील तर आम्हीही त्यांना कायदेशीर अडचणीत आणू, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.


कॉपी करू नका.