साकळी शेत शिवारात 30 वर्षीय मेंढपाळ तरुणाचा मृतदेह आढळला


The dead body of a 30-year-old shepherd youth was found in Sakhli Shet Shivar यावल : यावल तालुक्यातील साकळी शेत-शिवारात 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. हा तरुण शेतात मेंढी पालन करत होता व गतिमंद असल्याची माहिती आहे. तरुणाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मृत्यूचे कारण अस्पष्ट
साकळी शेत-शिवारातील बाळू वाणी यांच्या शेतात सोनू कोळपे (30, साकळी, मूळ रा.वाघापूर, बेहरगाव फाटा, ता.साक्री, जि.धुळे) हा तरुण 24 फेब्रुवारीपासून गतिमंद अवस्थेत बेपत्ता झाला होता. तीन दिवसानंतर मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी बाळू वाणी यांच्या शेतात तो मृतावस्थेत आढळला. याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी देविदास तुकाराम कोळपे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास यावलचे प्रभारी अधिकारी हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !