भुसावळातील प्रेरणा नगरात धाडसी घरफोडी : पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास


Daring house burglary in Prerna Nagar in Bhusawal  भुसावळ : शहरातील स्टार लॉनजवळील प्रेरणा नगर भागातील वयोवृद्ध महिलेचे घर फोडून चोरट्यांनी दिड लाखांची रोकड व अन्य चांदीचा ऐवज मिळून एक लाख 72 हजारांचा ऐवज लांबवला. घरफोडीचा प्रकार 26 ते 28 फेबु्रवारीदरम्यान घडला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात चित्रा लाला सोनार (64. प्रेरणा नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर फोडले
चित्रा सोनार या प्रेरणा नगरात वास्तव्यास आहेत. 26 ते 28 दरम्यान त्या कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी चोरट्यांनी साधत बंद घराचे कुलूप फोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून दिड लाखांची रोकड तसेच 12 हजार रुपये किंमतीचे दोन सोन्याच्या लक्ष्मीणे नाणे असा एकूण एक लाख 72 हजारांचा ऐवज लांबवला. बुधवारी सोनार या घरी आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ निरीक्षक गजानन पडघण व सहकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या परीसरातील सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांना निष्पन्न केले जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तपास हवालदार उमाकांत पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !