घाटात पिकअप उलटल्याने 14 प्रवासी ठार


14 passengers killed when pickup overturns in ghat भोपाळ : भरधाव पिकअप वाहन घाटात उलटून झालेल्या भीषण अपघातात 14 प्रवासी ठार झाले तर अन्य 20 प्रवासी जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातील डिंडोरी येथील बडझर घाटात घडला. जखमींना शाहपुरा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या गाडीत 45 प्रवासी असल्याचे सांगण्यात आले.

पिकअप मालकाला अटक
या अपघातात सहा पुरुष आणि आठ महिला ठार झाल्या. सर्वांचे वय 16 ते साठ दरम्यानचे आहे. पिकअप मालक अजमेर टेकम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंडला जिल्ह्यातील मसूर घुगरी गावाच्या चौकात कार्यक्रमासाठी आलेले गावकरी अमाही देवरीला परत होते. पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी होऊन वीस फूट खाली कोसळली.

पिकअपचा विमा ऑगस्ट 2021 पर्यंत तर सप्टेंबर 2022 मध्ये फिटनेसची मुदत संपली होती, अशी माहिती आहे. जिल्हाधिकारी विकास मिश्रा आणि पोलीस अधीक्षक अखिल पटेल यांनी शाहपुरा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.


कॉपी करू नका.