भुसावळात मोबाईल चोरी : आरोपीला अटक
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील भिरुड हॉस्पीटलमागील रहिवासी छाया नारायण पाटील यांच्या घरातून रविवारी मोबाईल चोरट्यांनी लांबवला होता. या प्रकरणी संशयीत आरोपी विजय चव्हाण यास अटक करण्यात आली. भिरुड हॉस्पिटलमागील जामनेर रोडवरील रहिवासी छाया नारायण पाटील या रविवारी नेहमीप्रमाणे सकाळी पाच वाजता मॉर्निग वॉकला जाण्यासाठी उठल्या. त्यांनी घराचा दरवाजा उघडून आवरा-सावर करत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या बेडवरील उशी खाली ठेवलेला मोबाईल लांबवला होता. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन भुसावळ बस स्टॉप परीसरात एक व्यक्ती मोबाईलची विक्री करण्यासाठी फिरत असल्याने त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण (20, रा.शनी मंदिर मागे, सोनिच्छा वाडी, जामनेर रोड, भुसावळ) याने छाया पाटील यांच्या घरातून मोबाईल चोरीची कबुली दिली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, सहाय्यक फौजदार तस्लिम पठाण, पोलिस नाईक रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, तुषार पाटील, संदेश निकम, समाधान पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, सुभाष साबळे, सुनील साळुखें आदींनी ही कारवाई केली. तपास पोलिस हेड कॉस्टेबल मिलिंद कंक हे करीत आहेत.


