नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली : दुचाकीला धक्का लागल्याने दाम्पत्य जखमी
Rickshaw overturns after losing control: Couple injured after being hit by two-wheeler जळगाव : प्रवासी घेवून येत असलेल्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली. या अपघातात दुचाकीला धक्का लागल्याने दुचाकीवरुन जात दाम्पत्य पडल्याने जखमी झाले. सोमवार, 1 रोजी नावरा (ता.यावल) फाट्यावर हा अपघात घडला. जखमी दाम्पत्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दाम्पत्य जखमी
कैलास विक्रम पाटील (51) हे पत्नी वंदना कैलास पाटील (50, रा.गिरडगाव, ता.यावल) हे दाम्पत्य दुचाकीने जात होते. रिक्षा अचानक उलटल्याने हे पती-पत्नी दुचाकीवरुन पडून जखमी झाले. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात हलविले. दाम्पत्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

