जळगावातील तृतीयपंथीयाचे घर फोडले : तीन लाखांचा ऐवज लंपास
Jalgaon third party’s house broken into : Three lakhs in lieu of compensation जळगाव : शहरातील तृतीय पंथीयाच्या बंद घरातून चोरट्यांनी रोकडसह सोने मिळून सुमारे तीन लाखांचा ऐवज लांबवल्याने खळबळ उडाली. शिवाजीनगरातून आसोद्याकडे जाणार्या रस्त्यावरील पवननगरात पूनम रेश्माजान ही तृतीयपंथीय भाडे तत्वाने वास्तव्यास आहे. त्या रविवारी कामानिमित्त अमळनेर येथे गेल्याने त्यांनी भुसावळस्थित आई शानूबाई यांना जळगावी बोलावल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
तीन लाखांचा ऐवज लंपास
शानूबाई मुलाची परीक्षा असल्याने सोमवारी सकाळी 10 वाजता जळगावात पोहोचल्यानंतर त्यांना बाथरूमचे व खोलीचे कुलूप तोडून पडलेले, दरवाजा उघडा दिसला. घरातील दोन्ही लोखंडी कपाट उघडून आतील तिजोरीचे कप्पे उघडे दिसले. घरात घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पूनम रेश्माजान यांना कळवले. सोमवारी तालुका पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. पूनम यांनी लोखंडी कपाटाच्या तिजोरीच्या कप्प्यात ठेवलेल्या दोन तोळे सोन्याच्या अंगठ्या, एक लाख 15 हजारांची रोकड, घरखर्चाचे 8900 रुपये, चटई वाटपाचे 11,500, अजमेर जाण्यासाठी जमवलेले 14000 व 2 हजार रुपयांची चिल्लर अशी एकूण 1,51,400 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.

