फसवणुकीचा नवीन फंडा : एटीएमला काळी पट्टी लावत 21 हजारांची रोकड काढली
New fund of fraud : Cash of 21 thousand was withdrawn by putting a black strip on the ATM अमळनेर : एटीएममध्ये पैसे काढताना बाहेर येणार्या रोकडच्या जागी काळी पट्टी लावून भामट्यांनी ग्राहकाचे 21 हजार लांबवल्याचा प्रकार अमळनेर शहरात घडला. फसवणुकीच्या या नवीन प्रकारामुळे ग्राहक चक्रावले आहेत. अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमळनेर शहरातील विजय मारूती मंदीराजवळील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम हा प्रकार घडला.
असे आहे फसवणूक प्रकरण
अमळनेर शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम विजय मारुती मंदिराजवळ आहे. 31 मार्च दुपारी 2 ते 1 व दुपारी 2 वाजेच्या दरम्यान अज्ञात दोन जणांनी एटीएम मशीनला काळीपट्टी लावली व एटीएममध्ये प्रवेश करून ग्राहकाला न मिळालेले 21 हजारांची रोकड लांबवली. या संदर्भात एटीएमचे रिजनल हेड महेश कुमार पवार यांनी बुधवार, 3 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात दोन जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहे.

