न्यायालयीन तारखांना गैरहजेरी : चाळीसगाव नायब तहसीलदारांना अटक


जळगाव : न्यायालयीन तारखांना सातत्याने गैरहजर राहणे चाळीसगावच्या नायब तहसीलदारांना चांगलेच भोवले असून त्यांना जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. देवेंद्र सुरेश भालेराव (52, सौरभ टेंट हाऊसजवळ, चंद्रलोक अपार्टमेंट जवळ, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

दोन वेळा समन्स तरीही न्यायालयात टाळली हजेरी
2016 मध्ये भालेराव हे जळगाव येथे कर्तव्यावर असताना जळगाव एसीबीने सापळा यशस्वी केला होता व नंतर गुन्ह्याच्या तपासात भालेराव यांचेही नाव निष्पन्न झाल्याने त्यांना त्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुरनं.3016/2016 लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तर जळागव न्यायालयात खटला क्रमांक 20/2016 अन्वये खटला सुरू असताना भालेराव यांच्याविरुद्ध दोन वेळा समन्स बजावूनही ते न्यायालयात उपस्थित नसल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध एनबीडब्ल्यू वॉरंट जारी केले होते. मंगळवारी सायंकाळी भालेराव यांच्यावर पाळत ठेवण्यात आली व ते दुचाकीने घराबाहेर पडल्यानंतर ख्वॉजामिया दर्ग्याजवळील पेट्रोल पंपापर्यंत पाठलाग केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी व संजोग बच्छाव, ईश्‍वर धनगर, मनोज जोशी, प्रशांत ठाकूर, नासीर देशमुख आदींनी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आरोपीला अटक केली. आरोपीला जिल्हा पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !