भुसावळातील पालिका पेंन्शनर्स असोसिएशनचे दुसर्‍या दिवशीही उपोषण कायम


भुसावळ : भुसावळ पेन्शनर्स असोसिएशनला सर्वोच्च न्यायालयाने सन 2004 पासून वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे पेन्शन विक्री व इतर सेवानिवृत्त आर्थिक लाभ मिळावा यासह प्रमुख आठ मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले असून मंगळवारीदेखील उपोषण कायम होते. या उपोषणाकडे पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे. या उपोषणाला केवळ दोन नगरसेवकांनी भेट देवून पाठिंबा दर्शवला. प्रमुख आठ मागण्यांसाठी सोमवारपासून पालिका कार्यालयासमोर पेंन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस.एल.पाटील यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी या आंदोलनाचा दुसरा दिवस होता मात्र नगरसेवक युवराज लोणारी, महेंद्रसिंग ठाकूर व माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी आंदोलनास भेट देवून पाठींबा दर्शवला. उर्वरित लोकप्रतिनिधींसह पालिका प्रशासनाच्या अधिकार्‍यांनीही आंदोलकांसोबत चर्चा केली नाही. दरम्यान मुख्याधिकारी करुणा डहाळे या मंगळवारी पालिका कार्यालयात आल्या, मात्र त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली नाही किंवा भेटही घेतली नाही. साखळी उपोषणात मंगळवारी दहा पेंन्शनर्स कर्मचारी सहभागी झाले होते, अशी माहिती उपाध्यक्ष मधूकर इंगळे यांनी दिली. यावेळी एस.एल.पाटील, उपाध्यक्ष मधुकर इंगळे, सचिव मधुकर पाटील, राजू खरारे, प्रमोद नकवाल, अरुण वाणी, डिगंबर भोळे, प्रमोद राणे, किशोर वाघुळदे, सुधाकर महाजन आदींसह उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !