बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार : पोलिसांनी वाढवली सुरक्षा

0

Firing outside Bollywood actor Salman Khan’s house : Police beef up security मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे पाच वाजता गोळीबार झाल्यानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञांताकडून हवेत गोळीबार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सलमान खान यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची चर्चा आहे.

डीसीपी म्हणाले : पाच जणांचा जवाब नोंदवला
‘एएनआय’शी बोलताना पोलिस म्हणाले की, दोन व्यक्ती रविवारी पहाट पाच सुमारास बाईकवरुन आल्या आणि त्यांनी घराबाहेर हवेत गोळीबार केला. त्यानुसार आम्ही तक्रार दाखल केली. चार ते पाच वेळा हवेत गोळीबार करण्यात आला. फॉरेंसिक टीमही घटनास्थळी आहे. आमच्या 15पेक्षा अधिक टीम यावर तपास करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती मुंबईचे डीसीपी राज तिलक रौशन यांनी दिली आहे. आतापर्यंत पाच जणांचा जबाब पोलिसांनी नोंदविल्याचे ते म्हणाले.

यापूर्वीही मिळाल्या होत्या धमक्या
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली होती. एका टेलिव्हिजन मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोईने उघडपणे सांगितले होते की, सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्यातील उद्दिष्ट आहे.

पोलिसांकडून तपास : सुरक्षा वाढवला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही सूचना केली, असे वृत्त आहे. दुसरीकडे, या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासातून खरी माहिती समोर येईल. त्यामुळे पोलिसांच्या तपास होईपर्यंत यावर काही सांगता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

संजय राऊतांची टिका : सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांना संरक्षण
मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, गृहमंत्री राजकारणात व्यस्त आहेत. सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण देण्यात येत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.


कॉपी करू नका.