स्व.निखील यांच्या जनसेवेच्या मार्गावर चालण्यासाठी कार्यकर्त्यांची कायम साथ लाभावी

अ‍ॅड.रोहिणी खडसे : स्व.निखील खडसे स्मृती दिनानिमित्त आदरांजली सभा

0

मुक्ताईनगर : स्व.निखील एकनाथराव खडसे यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त आदिशक्ती मुक्ताई सहकारी सुतगिरणीतील स्व.निखील खडसे स्मृतीस्थळावर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी स्व.निखील खडसे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितांनी स्व.निखील खडसे यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून आणि दोन मिनिटे मौन बाळगुन स्व.निखील यांना श्रद्धांजली वाहिली.

प्रत्येकाच्या सुख-दुःखात समरस होणारे व्यक्तीमत्व
अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी स्व.निखील खडसे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, स्व.निखील खडसे हे मितभाषी व उत्तम संघटन कौशल्य आत्मसात असणारे व्यक्तिमत्व होत. आपल्या जिल्हा परिषद सदस्य कार्यकाळात त्यांनी अनेक विकास कामे केली. कुणी संकटात असणारा व्यक्ती मदत मागायला आला तर सर्व मतभेद बाजुला सारून ते संकटात असणार्‍या व्यक्तीला नेहमी मदतीचा हात पुढे करत. समाजातील प्रत्येक लहान थोर मंडळी सोबत त्यांचा संपर्क होता. कोणताही अभिनिवेश न बाळगता ते प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधत प्रत्येकाच्या सुख दुःखात, गरजेच्या काळात धावुन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्याद्वारे त्यांनी जळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यात युवकांचा गोतावळा निर्माण केला. आज राज्यभर दौरे करत असताना विविध ठिकाणी त्यांच्या मित्र परिवारातील सदस्य भेटून त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. आज स्व.निखील भाऊ आपल्यात नसले तरी तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या रूपाने ते सदैव आमच्या सोबत आहेत. निखील यांनी दाखवलेल्या जनसेवेच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहे त्यासाठी तुम्हा कार्यकर्त्यांची साथ सोबत सहकार्य लाभत आहे ती अशीच कायम ठेवावी. मुक्ताई सहकारी सुतगिरणीद्वारे स्थानिक युवक, महिलांना रोजगार देण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या पश्चात त्यांचे हे स्वप्न पुर्ण करू शकले याचे मला आत्मिक समाधान असल्याचे रोहिणी म्हणाल्या. निखील खडसे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना गहिवरून आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटी, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, भागवत पाटील, साहेबराव पाटील, प्रवीण पाटील, बापू ससाणे, प्रदीप साळुंखे, रउफ खान, निलेश भालेराव, राहुल पाटील ,भैय्या पाटील, अय्याज पटेल, मुश्ताक मण्यार, पक्ष पदाधिकारी व स्व.निखील खडसे मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.


कॉपी करू नका.