रेल्वे प्रवाशांना दिलासा : पुणे-विरांगणा, एलटीटी-प्रयागराजसाठी 22 विशेष गाड्या धावणार !

0

Relief for railway passengers : 22 special trains will run for Pune-Virangana, LTT-Prayagraj! भुसावळ : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते सूबेदार गंज (प्रयागराज) आणि पुणे ते वीरांगना लक्ष्मीबाई झांसी दरम्यान 22 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालविणार येणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

22 रेल्वे गाड्यांचा दिलासा
उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरीक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) आणि सूबेदार गंज (प्रयागराज) तसेच पुणे ते वीरांगना लक्ष्मीबाई झांसी दरम्यान 22 अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गर्दी असली तरी सुध्दा या गाडीमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. भुसावळ विभागातील प्रवाशांना या गाड्यामुळे सुविधा उपलब्ध होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस – सूबेदार गंज साप्ताहिक विशेष गाडी (22 फेर्‍या) धावेल.

साप्ताहिक गाड्यांना या स्थानकावर थांबे
04116 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 19 एप्रिल ते 28 जून 2024 पर्यंत दर शुक्रवारी रात्री 8.15 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी 5.10 वाजता सुभेदारगंज येथे पोहोचेल. या गाडीच्या 11 फेर्‍या होतील तसेच 04115 साप्ताहिक विशेष सुभेदारगंज येथून गुरुवार, 18 एप्रिल ते 27 जूनपर्यंत दर गुरुवारी सकाळी 11.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी 4.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीच्या 11 फेर्‍या होतील. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, चित्रकूट धाम, बांदा, रागौल, भरवा सुमेरपुर, कानपूर सेंट्रल आणि फतेहपुर येथे थांबेल.

पुणे-विरांगणा लक्ष्मीबाई झाशी साप्ताहिक विशेष गाडी 22 फेर्‍या
पुणे येथून 21 एप्रिल ते 30 जून या काळात दर रविवारी दुपारी चार वाजता ही गाडी पुण्यातून सुटेल व दुसर्‍या दिवशी दुपारी एकला विरांगणा लक्ष्मीबाई झाशी येथे पोचेल, या गाडीच्या 11 फेर्‍या होतील, तर विरांगणा लक्ष्मीबाई झाशी येथून साप्ताहिक गाडी दि. 20 एप्रिल ते 29 जून या काळात धावणार आहे. दर शनिवारी दुपारी 12.50 वाजता सुटून पुण्यात दुसर्‍या दिवशरी 11.35 वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या 11 फेर्‍या होतील. ही गाडी दौड कॉडलाईन, नगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापूरम, भोपाळ, विदिशा, बीना व ललितपूर येथे थांबणार आहे.


कॉपी करू नका.