खंडाळा येथे जुन्या वादातून वेल्डींग कारागीराला मारहाण : चौघांविरोधात गुन्हा


Welding worker assaulted due to old dispute at Khandala : Crime against four भुसावळ : भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथे जुन्या वादातून वेल्डींग काम करणार्‍या तरुणासह त्याच्या मामेभावाला मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवार, 29 रोजी रात्री गावाबाहेरील पुलाजवळ घडली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रितेश राजेंद्र महाजन (21, खंडाळा, ता.भुसावळ) हा तरुण वेल्डींग कारागीर असून त्याच्यासह मामेभावाला जुन्या वादातून संशयीताने शिविगाळ करीत फायटर व हातातील कड्यानेे मारहाण केली. याप्रकरणी पवन राजू कोळी, सुशील अनिल कोळी, गणेश सुरेश कोळी, सुनील दीपचंद कोळी (खंडाळा, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुनह दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश राठोड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !