प्रचारासाठी जाण्यापूर्वीच सुषमा अंधारेंना नेणारे हेलिकॉप्टर क्रॅश : पायलट बचावला
महाड : बारामती येथे आयोजित महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जाणार्या सुषमा अंधारे यांना नेणारे हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून या अपघातात पायलट मात्र सुखरूप बचावला आहे तर हेलिकॉप्टरचे मात्र तुकडे तुकडे झाले. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या सुषमा अंधारे महाडमध्येच आहे. या दुर्घटनेबाबात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी सुखरूप आहे. माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी.
अपघाताचे कारण अस्पष्ट
बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले. ही घटना महाडमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या अपघातात पायलट सुखरूप आहेत.
