भुसावळसह खंडाळा येथे विवाहितेचा विनयभंग : चौकडीविरोधात गुन्हा
Rape of married woman in Khandala with Bhusawal : Crime against foursome भुसावळ : भुसावळ शहरासह खंडाळा गावात विवाहितांचा दोन वेगवेगळ्या घटनेत विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी चार संशयीतांविरोधात शहर व तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
खंडाळ्यात विवाहितेच्या पतीला ठार मारण्याची धमकी
भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथील 19 वर्षीय विवाहितेच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत संशयीताने पीडीतेचा हात पकडत तिचा विनयभंग केला. ही घटना मंगळवार, 30 रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास गावातील मराठी शाळेसमोर घडली. याप्रकरणी रितेश राजेंद्र महाजन (खंडाळा) विरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुभान तडवी करीत आहेत.

शांती नगरात विवाहितेचा विनयभंग : त्रिकुटाविरोधात गुन्हा
भुसावळ शहरातील शांती नगरातील आयएमए हॉलजवळ जुना सातारा भागातील 21 वर्षीय विवाहिता जात असताना त्रिकूटाने पीडीतेचा हात धरत व टॉप ओढत विनयभंग केला व शिविगाळ केली. ही घटना मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तेजस सपकाळे (25), कुणाल हटकर (26) व एका अनोळखीविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मो.वली सैय्यद करीत आहेत.