शरद पवारांचा दावा : निलेश लंकेंना उमेदवारी न मिळण्यासाठी उद्योगपतीला पाठवले

0

Sharad Pawar’s claim: Nilesh Lankan was sent to the industrialist to prevent him from getting candidature अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचा आखाडा सर्वत्र तापला असून दररोज राजकारणात नेत्यांकडू दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यात अहमदनगरसाठी निलेश लंके यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर टिकादेखील अलीकडे त्यांच्या विरोधकांनी करीत त्यांना इंग्लिश बोलता नसल्याची केली होती. या संदर्भात माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, निलेश लंके यांना मी लोकसभेची उमेदवारी देऊ नये म्हणून महसूलमंत्री विखे यांनी माझ्याकडे तीन आठवड्यांपूर्वी मुंबईतील एका उद्योगपतीला पाठवल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही भाषेत बोलण्याचा संसदेत अधिकार
शरद पवार म्हणाले की, सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांना इंग्रजी बोलता येत नाही, यावरुन हिणवले होते मात्र संसदेत कोणत्याही भाषेत बोलण्याचा अधिकार आहे. मी अनेकदा संसदेत इंग्रजी, हिंदी आणि अगदी मराठीतही प्रश्न मांडले आहेत. तुमच्या भाषणाचे शब्दश: हिंदी आणि इंग्रजीत भाषांतर केले जाते, असे ते म्हणाले.

लंकेंचे नाव येताच विखेंची झोप उडाली
शरद पवार म्हणाले की, अहमदनगरसाठी निलेश लंके यांचे नाव आले तेव्हा विखे-पाटलांची झोप उडाली. विखे-पाटलांनी कधीही माझ्या दारात पाऊल टाकले नाही, पण नीलेश लंकेंना उमेदवारी देऊ नये, यासाठी त्यांनी त्या उद्योगपतीला माझ्याकडे पाठवले. यावरुन एक स्पष्ट होते की, सत्ता आणि साधनं असतील तरी माणुसकी, सामान्य माणसांचे प्रेम हा खजिना आहे. त्यामुळे निलेश लंकेंचा पराभव करणे शक्य नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.


कॉपी करू नका.