पत्नीला अश्लील मेसेज : आरोपी पतीला डोंबिवलीतून अटक
भुसावळ : कौटुंबिक वादातून प्रकरण विभक्त होण्यापर्यंत आल्याने न्यायालयात खटला सुरू असतांना पत्नीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवणार्या आरोपी पतीच्या डोंबिवलीतून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे संशयीताच्या घराबाहेर पोलिस फोटो काढत असतांना तुम्ही बँकवाले आहात का? अशी विचारणा झाल्यानंतर पोलिसांनी होकार देत मुलगा घरात आहे का? असे विचारल्यानंतर संबंधितानी होकार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. कौटुंबिक वाद टोकाला गेल्यानंतर दाम्पत्याने फारकतीचे प्रकरण न्यायालयात दाखल केले होते तर गत महिन्यात आरोपी पतीने पत्नीला अश्लील मेसेज केल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल होता मात्र आरोपी पोलिसांना गवसत नव्हता. शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा पोलिस हवालदार सुनील (बंटी) सैदाणे, समाधान पाटील यांचे पथक डोबिवलीत गेल्यानंतर विष्णू नगरातील रहिवासी असलेल्या आरोपीला पतीला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांना कुटुंबियांनी आरोपी घरात नसल्याचे सांगितल्याने त्यांनी संशयीताच्या घराचा सेल्फी काढत असतानाच आरोपीच्या वडिलांना त्यांना बँकवाले आहेत का? म्हणून विचारणा केली व होकार मिळताच त्यांनी घरातील सदस्यांची विचारणा केल्यानंतर मुलेदेखील घरात असल्याचे सांगताच बंद खोलीतून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व नंतर आरोपीची जामिनावर मुक्तता झाली.


