महाविकास आघाडीतील रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील उद्या भरणार उमेदवारी अर्ज

शक्तीप्रदर्शनानंतर दाखल होणार उमेदवाीर अर्ज ः लाखोंच्या संख्येने मतदार राहणार उपस्थित

0

Raver Lok Sabha candidate Shriram Patil of Mahavikas Aghadi will file his nomination form tomorrow रावेर : रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील हे उद्या बुधवार, 24 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड व शिवसेनेचे (उबाठा गट) युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजता दाखल करणार आहेत.

रावेरातून सकाळीच रवाना होणार
सकाळी सात वाजता श्रीराम पाटील हे महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह रावेर येथील त्यांच्या संपर्क कार्यालय (श्रीराम ऑटो) येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होणार आहेत. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रस्थापितांविरुद्ध सामान्य कुटुंबातील उमेदवार अशी या मतदार संघात लढत होत आहे.

शिवतीर्थापासून शक्तीप्रदर्शनानंतर दाखल होणार उमेदवारी
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रावेर मतदार संघातील ठिकठिकाणावरून मतदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी साडे नऊ वाजता जळगाव येथील शिवतीर्थ मैदान येथे एकत्रित जमणार आहेत. नंतर तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत जाऊन सकाळी 11 वाजता अर्ज दाखल केला जाईल. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरूवात होणार आहे.


कॉपी करू नका.