अवैध वाळू वाहतूक : पथकाकडून ट्रॅक्टर ट्रॉली जप्त
रावेर : कर्जोदनजीक अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरसह ट्रॉली महसूल पथकाने पुन्हा जप्त केल्याने अवैधरीत्या वाळू व्यवसाय करणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, महसूल नायब तहसीलदार सी.जी.पवार, तलाठी शैलेश झोटे, तलाठी यासीन तडवी, कोतवाल सलीम तडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, महसूल पथक आल्याची माहिती मिळताच अटवाळे व पुनखेडानजीक अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर-टॉली पसार झाले.


