भुसावळात मिलन मटका खेळताना एकास अटक


भुसावळ : शहरात राहुल नगराशेजारील दगडी पुलाच्या आडोशाला मिलन नाईट मटका जुगाराचा खेळ खेळताना संशयीत आरोपी दीपक लखनलाल जोहरे (रा.चमेली नगर, भुसावळ) यास गुरुवारी रात्री 7.20 वाजता अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 460 रुपयांची रोकड तसेच सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, रमण सुरळकर, महेश चौधरी, विकास सातदिवे, तुषार पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी ही कारवाई केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !