भुसावळचे तापमान सलग पाच दिवसांपासून 43 अंशाहून अधिक

जनजीवनावर परिणाम : बाजारात मंदिचे सावट

0

Bhusawal temperature more than 43 degrees for five consecutive days भुसावळ : हॉटसिटी भुसावळ शहराचे कमाल तापमान दिवसागणीक वाढत आहे. रविवारी शहराचे कमाल तापमान 43.3 तर किमान तापमान 27.8 अंशांवर असल्याची नोंद केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाने केली. सलग पाच दिवसांपासून कमाल तापमान 43 अंशांवर आहे. रविवारी सकाळी काही अंशी ढगाळ वातावरण होते मात्र दुपारपासून कडाक्याचे उन पडल्याने उच्चांकी तापमान कायम राहिले.

रविवारी प्रखर उन्हासोबतच उकाड्याने नागरिक हैराण झाले. सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण सकाळी साडेआठ वाजता 36 टक्यांवर होते तर दुपारनंतर ते 30 टक्के असल्याची नोंद केंद्रीय जलआयोगाने केली. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाड्याचे प्रमाणही वाढले. उच्चांकी तापमानामुळे शहरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. गेल्या पंधरवड्यात 22 एप्रिल वगळता एक दिवसही कमाल तापमान चाळीशीच्या आत आले नाही.

रविवारच्या बाजारात गर्दी कमी
शहराचे तापमान अधिक असल्याने रविवारच्या बाजारातही भाजीपाला खरेदीसाठी नेहमीप्रमाणे गर्दी कमी होती. सायंकाळी सहा वाजेनंतर भाजीबाजारात नेहमीप्रमाणे अधिक गर्दी आढळून आली. शहरातील मुख्य बाजारपेठेतही दुपारी शुकशुकाट होता तर सायंकाळी मात्र काही अंशी गर्दी वाढली.


कॉपी करू नका.