लोकसभा निवडणूकीत कर्तव्याला दांडी : 30 कर्मचार्यांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा
Dereliction of duty in Lok Sabha elections : A case has been registered against 30 employees in Dharangaon police धरणगाव : लोकसभा निवडणुकीत नियुक्त ठिकाणी न जाता कामाला दांडी मारणार्या 30 कर्मचार्यांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दांडी बहाद्दर कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नायब तहसीलदारांनी दिली तक्रार
लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचार्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात साहित्य घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. सर्व साहित्य घेऊन कर्मचारी आणि अधिकारी रवाना झाले मात्र यापैकी 30 कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर पोहोचले नाही. गैरहजर राहण्याबाबत त्यांनी कुठलीही परवानगी न घेतल्याने याबाबत जळगाव ग्रामीणचे नायब तहसीलदार दिगंबर भिकन जाधव यांच्या फिर्यादीवरून 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या कर्मचार्यांविरोधात दाखल झाला गुन्हा
मतदान केंद्राध्यक्ष (पीआरओ) प्रशांत सुभाष शेलाई (गणेशपूर, चाळीसगाव), सुनील दिनकर चाऊक, (मांडळ, ता.अमळनेर), दीपक गणपत आवटे (चाळीसगाव), शेख अजमोद्दीन शेख जैनोद्दीन (भडगाव), विलास गोकूळ पाटील (सावखेडे, ता.पारोळा), जितेंद्र बाबूलाल पाटील (कळवण तांडा, ता. भडगाव), रमेश यादव पाटील (जळगाव), घनश्याम मगन ईसई (वडगाव, ता. पाचोरा), भगवान भिका सुरवाडे (अमळनेर), विलास यादव नेरकर (बदरखे तांडा, ता.पाचोरा), नागसेन जालम बागूल (पारोळा), किरण पोपट महाजन, (चाळीसगाव), विजय दगा पाटील (राजदेहरे, चाळीसगाव), गुलाबराव किसन चव्हाण (सार्वे पिंप्री, ता. पाचोरा), संजीव यशवंत नागरे (राजदेहरे तांडा, चाळीसगाव), नरेंद्र शंकर जोशी (पाचोरा), प्रमोद दत्तात्रय पाठक (एरंडोल), सतीश पतंगराव पाटील (देवळी, ता. चाळीसगाव), राजू उत्तम राठोड (पाचोरा), रमेश मोहन पाटील (हिरापूर, ता.चाळीसगाव), रवींद्र रामराव देवकर (दहिवद) ता. चाळीसगाव), संजय उत्तम पाटील (पाचोरा), रणधीर सीताराम वाघ (जळगाव), राकेश गणपत कंजरभाट (जळगाव), सुनील नानू नगराळे, विजय नाना पाटील (अमळनेर), अजित तानसिंग चव्हाण (भडगाव), भाऊसाहेब विश्वास पाटील (महिंदळे, ता. भडगाव), राहुल बाळू भामरे (अंतुर्ली, ता. पाचोरा), विजय साहेबराव घोडेस्वार (बहाळ, ता. चाळीसगाव), गणेश सदाशिव सोनार (जळगाव) या कर्मचार्यांचा समावेश आहे.