विवाहितेचा छळ : बोदवडमधील पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा
बोदवड : लग्नात मानपान दिला नाही तसेच चारीत्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी बोदवडमधील पतीसह सासरे, सासू, नणंद, जेठ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील उमरी खुर्द येथील विवाहिता नालंदा सचिन दांडगे यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी पती सचिन यशवंत दांडगे, सासरे यशवंत रुपाजी दांडगे, सासू सुनंदा यशवंत दांडगे, नणंद सारीका यशवंत दांडगे, जेठ मिथुन यशवंत दांडगे, नणंद सुषमा अनिल वाघ यांच्याविरुद्ध बोदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक गजानन काळे करीत आहेत.


