जळगाव व रावेर लोकसभा विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीनचे वितरण

0

भुसावळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भुसावळ तहसील कार्यालयाच्या गोदामात ठेवण्यात आलेले मतदान यंत्रे ही रविवारी चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, चोपडा व एरंडोल या पाच विधानसभा क्षेत्रासाठी सकाळी वितरीत करण्यात आली तर सोमवारी सकाळी 9 वाजता जळगाव शहर व जळगाव ग्रामीण मतदारसंघात तर दुपारी 12 वाजता रावेर, जामनेर, मुक्ताईनगर व भुसावळ मतदारसंघात ईव्हीएम वितरण करण्यात आले. मशीन नेण्यासाठी महामंडळाच्या मालवाहतूक बसचा वापर करण्यात आला.

पोलीस अधिकार्‍यांची उपस्थिती
मतदान यंत्राचे वितरण होत असल्याने तहसील कार्यालयातील गोदामाकडे जाणारा मार्ग बॅरेकेटने बंद करण्यात आला. तेथे पोलिसांचा बंदोबस्त तैनान करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविद अंतुर्लीकर, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, तहसीलदार निता लबडे, नायब तहसीलदार अंगद आसटकर, सुनील समधानी यांच्यासह विविध तालुक्यातील आलेले तहसीलदार व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तहसील कार्यालयाच्या गोदामातून रविवार व सोमवारी दोन दिवस मतदान यंत्रे संपूर्ण जिल्हाभरातील विधानसभा क्षेत्रात वितरीत करण्यात आली. बंदोबस्ताची पाहणी पोलीस अधीक्षक डॉ.रेड्डी यांनी केली.

बंदोबस्तात ईव्हीएम रवाना
लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी मतदान यंत्रे येथील तहसील कार्यालयातील गोदामात ठेवण्यात आली आहेत. ही यंत्रे व व्हीव्हीपॅट मशीन हे प्रत्येक मतदार संघनिहाय वाटप केली जात आहे. रविवार व सोमवार असे दोन दिवस 11 मतदारसंघात मतदार यंत्रांचे वाटप करण्यात आली. रविवारी सकाळी नऊ वाजता चाळीसगाव, पाचोरा तर दुपारी 12 वाजता अमळनेर, चोपडा व एरंडोल या मतदार संघासाठी ईव्हीएम वितरण करण्यात आले. सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

सोमवारी या मतदारसंघात वितरण
सोमवारी सकाळी 9 वाजता जळगाव शहर व जळगाव ग्रामीण तर दुपारी 12 वाजता रावेर, जामनेर, मुक्ताईनगर व भुसावळ येथे ईव्हीएम वितरण करण्यात आले. मशीन नेण्यासाठी महामंडळाच्या मालवाहतूक बसमधून नेण्यात आले. यावेळी प्रत्येक मशीनसोबत बीएसएफचे जवान कमांडो बंदोबस्तासाठी तैनात होते.


कॉपी करू नका.