पाच हजारांची लाच मागणी भोवली : रावेर तालुक्यातील ग्रामविकास अधिकार्‍याविरोधात गुन्हा

0

A bribe of five thousand was demanded : a case against the village development officer in Raver taluka भुसावळ : शासकीय कागदपत्रे काढून दिल्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती पाच हजारांची लाच मागणी करणार्‍या रावेर तालुक्यातील विवरा ग्रामविकास अधिकार्‍याविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. डिगंबर जावळे असे गुन्हा दाखल झालेल्या ग्रामविकास अधिकार्‍याचे नाव असून संशयीत मात्र पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

असे आहे लाच प्रकरण
विवरे बु.॥, ता.रावेर गावातील 37 वर्षीय तक्रारदार यांना बँकेतून कर्ज काढण्यासाठी कागदपत्रे हवे होते. यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून नमुना नंबर 8, फेरफार दाखला, चर्तुसीमा व ना हरकतीचा दाखला इत्यादी कागदपत्र काढून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे यांनी 21 फेब्रुवारी 2024 रोजी दहा हजार रुपये लाच मागितली होती व त्याचदिवशी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणीत आरोपीने पाच हजारांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले मात्र आरोपीला सापळ्याचा संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर आरोपीविरोधात मंगळवारी निंभोरा, ता.रावेर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर आरोपीला पथकाची कुणकुण लागताच संशयीत पसार झाला.

यांनी केली कारवाई
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव व पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, चालक एएसआय सुरेश पाटील, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हा गुन्हा दाखल केला.


कॉपी करू नका.