खंडाळा गावातील हाणामारीप्रकरणी 22 संशयीतांची निर्दोष मुक्तता

0

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथे 2016 साली गावात लोकनाट्याच्या कार्यक्रमाचे शासकीय परवानगी न घेता आयोजन करण्यात आले होते मात्र या कार्यक्रमात दोन गटात शिवीगाळ झाल्यानंतर हाणामारी झाली होती. या प्रकरणी 22 संशयीतांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले.

सबळ पुराव्याअभावी संशयीत निर्दोष
सबळ पुराव्याअभावी 22 संशयीतांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अशोक पाटील, पत्रकार हर्षल पाटील, शंकर पाटील, हेमचंद्र पाटील (छोटू भाऊ) व यासह अन्य संशयीतांविरोधात गुन्हा दाखल होता. सत्र न्यायालयाचे न्या.द.भा.डोमळे यांनी 16 एप्रिल 2024 रोजी सबळ पुराव्याअभावी 22 संशयीतांची निर्दोष मुक्ताता केली. संशयीतांतर्फे अ‍ॅड.प्रकाश मोझे, अ‍ॅड.पी.डी.फेगडे, अ‍ॅड.रेखा सपकाळे, अ‍ॅड.योगेश बाविस्कर यांनी काम पाहिले.


कॉपी करू नका.