भुसावळ तालुक्यात शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार 27 हजार विद्यार्थ्यांना पुस्तके
भुसावळ : समग्र शिक्षा मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत भुसावळ शहरासह तालुक्यातील 27 हजार 137 विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके मिळणार आहे. शिक्षण विभागाकडून पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वीच पहिले ते आठवीसाठी लागणारी 20 टक्के पुस्तके पहिल्या टप्यात येथे आली आहे.
20 टक्के पुस्तके प्राप्त
समग्र शिक्षा अभियांन अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजनेतून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके दिली जाणार आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली पाहिजे यासाठी येथील शिक्षण विभागाकडून शासनाकडे पुस्तकांची मागणी नोंदविली आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपूर्वी पहिल्या टप्यात येथील शिक्षण विभागाला 20 टक्के पुस्तके उपलब्ध झाली आहे. शाळा सुरू होते तोपर्यंत सर्व 100 टक्के पुस्तके मिळणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्वच विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके दिली जाणार आहे, असे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी सांगितले. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारावर स्वागत करून वर्गात गेल्यावर प्रत्येक विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके देण्याचे शासनाचे निर्देश आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पुस्तके दिली मिळतील.


अशी नोंदवली मागणी
पहिलीसाठी 2620, दुसरीसाठी 3009, तिसरी- 3403, चौथी-3427, पाचवी – 3311, सहावी- 3770, सातवी- 3866 व आठवीसाठी 3731 अशी एकूण 27 हजार 137 पहिली ते आठवीपर्यतच्या पुस्तकांची मागणी नोंदविली आहे. यातील 20 टक्के पुस्तके आली आहे.