आदर्श नागरिक बनण्यासाठी आदर्श विद्यार्थी होणे गरजेचे : आरती चौधरी

0

भुसावळ : आदर्श नागरिक बनण्यासाठी आदर्श विद्यार्थी होणे आवश्यक आहे. त्यासाठी ध्येय निश्चित करून त्या ध्येयासाठी मेहनत, कष्ट घ्यायला तयार असायला पाहिजे, असे विचार समूपदेशक आरती चौधरी यांनी व्यक्त केले. स्व.झेंडूजी महाराज बेळीकर आयोजित वारकरी संप्रदायाच्या बालसंस्कार शिबिरात त्या बोलत होत्या.

बर्‍हाटे शाळेत शिबिराचे आयोजन
भरत महाराज बेळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व दीपक महाराज शेळगावकर व यांच्या मार्गदर्शनाखाली बाल संस्कार शिबिर बर्‍हाटे शाळेत आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत बुधवार, 1 मे रोजी महिला क्रीडा मंडळातर्फे मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.

देशाचे उज्वल नागरिक बना
महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष आरती चौधरी यांनी आदर्श नागरिकात्वाची जडण-घडण या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, जीवनात काही तत्व अंगीकारले पाहिजे तर तो विद्यार्थी आदर्श विद्यार्थी व पर्यायाने आदर्श नागरिक बनू शकतो. आपल्या देशाच्या इतिहासात अनेक महापुरुषांनी देशासाठी कार्य कले त्याचे फळ आपल्याला आज मिळते आहे. तुम्ही देशाचा भविष्य काळ आहात. तुम्ही चांगले नागरीक बनुन देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल बनवा.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्रभा पाटील होत्या. अभ्यासाबरोबरच वारकरी संप्रदायाचे संस्कार मुलांवर होत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे. याचा त्यांना पुढील आयुष्यात निश्चित फायदा होईल, असे त्या म्हणाल्या. यावेळी महिला क्रीडा मंडळाच्या सचिव लता होसकोटे, जयश्री ओक, प्रीता पिंगळे, मंगला पाटील, विजया निकम संगीता चौधरी आदींची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.