रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी संजय ब्राह्मणे यांना विजयी करा

सावदा येथे वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आवाहन : संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ दौरा

0

Win Sanjay Brahmane for the development of Raver Lok Sabha Constituency सावदा : वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अ‍ॅड.योगेश तायडे, तालुका महासचिव श्रीकांत संन्यास यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने सावदा व परिसरात घरोघरी जात प्रचार रॅली काढले. वंचितचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. भुसावळातील जावई व उच्चशिक्षीत व सुसंस्कृत चेहरा असलेल्या संजय ब्राह्मणे यांना रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी संधी देण्याचे आवाहन करण्यात आले.

वंचित आघाडी सशक्त पर्याय
शेकडो कार्यकर्त्यांनी प्रचार रॅलीत उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. वंचित बहुजन आघाडीची शोषित, पीडित, वंचित समाजाविषयी लढत असून राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची असलेली भूमिका नागरिकांना पटवून देण्यात आली. रावेर लोकसभेत वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव सशक्त पर्याय असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी मतदारांशी बोलताना सांगितले.


कॉपी करू नका.