मुक्ताईनगरात श्रीराम पाटील यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

Spontaneous response of voters to Shriram Patil’s campaign rally in Muktainagar मुक्ताईनगर : महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगरात शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागातून प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचारफेरीला कार्यकर्त्यांसह मतदारांनीही भरभरून प्रतिसाद दिला. ही प्रचार फेरी शहराच्या सर्व प्रमुख मार्गांवरून निघाली.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार : श्रीराम पाटील यांचे आश्वासन
गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ताईनगर येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार रक्षा खडसे यांनी तो सोडवण्यासाठी काहीही हालचाली न केल्याचे मतदारांनी यावेळी सांगितले. त्यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी मतदारांनी आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठवल्यास पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर प्राधान्याने लक्ष देण्याचे आश्वासन मतदारांना दिले. याबाबत विशेषतः स्त्री मतदारांनी आनंद व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत ही प्रचार फेरी मुक्ताईनगर शहरातून सुरू होती. मतदारांनी श्रीराम पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आश्वासन यावेळी दिले.


कॉपी करू नका.