वरणगाव शहरात वंचित आघाडीच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

उमेदवार संजय ब्राह्मणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन

0

वरणगाव : वंचित बहुजन आघाडीचे रावेर लोकसभेतील उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ वरणगाव शहरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी रॅलीत उस्फूर्तपणे सहभाग घेतला. वरणगाव शहरातील सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.

यांची होती उपस्थिती
वरणगावातील प्रचार रॅलीत उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे, जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनावणे, वंदना आराख, बबन कांबळे, विकास इंगळे, प्रमोद बाविस्कर, निलेश जाधव, गणेश इंगळे, जितू सुरवाडे, संदीप सुरवाडे, पंकज जोहरे, मुकुंद धुरंदरे व कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.