रावेर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रयोगशाळा व क्ष-किरण विभागाला भरदुपारी टाळे


रावेर : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना आशेचा किरण ठरणार्‍या ग्रामीण रुग्णालयात रुग्ण येत असलेतरी वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन हे प्रशिक्षणासाठी बाहेर गेल्याची संधी साधून कार्यालयातील उभयतांकडून भर दुपारीच प्रयोग शाळा व क्ष-किरण विभागाला टाळे ठोकले जात असल्याने सर्वसामान्य नागरीकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराची चौकशी करून कारवाईची मागणी होत आहे.

अधिकार्‍यांना कर्तव्याचा विसर
गरीब जनतेच्या आरोग्याची जीवनदायीनी म्हणून रावेर ग्रामीण रुग्णालयाची ओळख आहे. सदैव रुग्ण सेवेसाठी ग्रामीण रुग्णालय सज्ज असलेतरी प्रयोग शाळा विभाग व क्ष-किरण विभागाच्या अधिकार्‍यांना कर्तव्याचा विसर पडल्याचा आरोप आहे. सकाळी नऊवाजेपासून येथील ग्रामीण रुग्णालयात महिला व पुरुषांची विविध आजाराच्या उपचारार्थ गर्दी होते शिवाय दुपारी 12 वाजता ओपीडी बंद होते व त्यानंतर केवळ आपतत्कालीन रुग्णांसाठी रुग्णालय उघडे असते. मात्र ओपीडी बंदचा गैरफायदा घेत येथील प्रयोग शाळा व क्ष-किरण विभागाचे प्रमुख त्यांच्या विभागाला टाळे लावून त्यांची खाजगी कामे करण्यासाठी निघून जात असल्याचा प्रकार कर्तव्य दक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन हे प्रशिक्षणासाठी बाहेर असल्यापासून सुरू आहे. यामुळे सर्वसाधारण जनतेतून संताप व्यक्त होत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी संबधित विभाग प्रमुखांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची मागणी होत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !