जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला उडवले : आईसह तीन चिमुकले ठार

संतप्त जमावाची दगडफेकड : दोन पोलीस जखमी : कारमध्ये आढळली गांजा पाकिटे

0

A speeding car blows up a two-wheeler in Jalgaon : Three children, including their mother, are killed जळगाव : ओव्हरटेक केल्यानंतर भरधाव कारने दुचाकीला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात महिलेसह तिच्या दोन मुलांचा व उपचारादरम्यान भाच्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ मंगळवार, 7 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने कारमधील तिघांना चोपून काढले तर तरुणांच्या मदतीला आलेली कारदेखील फोडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांचा ओढवला मृत्यू
वत्सलाबाई उर्फ राणी सरदार चव्हाण (30), मुलगा सोमेश सरदार चव्हाण (2), सोहम सरदार चव्हाण (7, सर्व रा.शिरसोली, ता. जळगाव) व वत्सलाबाई यांचा भाचा लक्ष्मण भास्कर राठोड (12) यांचा समावेश आहे. मयत महिला वच्छला चव्हाण या रामदेववाडी येथे आशा वर्कर म्हणून नियुक्तीला होत्या.

ओव्हरटेकनंतर अपघात
कार क्रमांक (एम.एच.19 सी.व्ही.6767) ही पाचोर्‍याकडे भरधाव जात असताना तिने रामदेववाडी गावाजवळा एका वाहनाला ओव्हरटेक केले वेग जास्त असल्याने कारने पुढे दुचाकीला धडक देत फरफटत नेलेे. अपघातानंतर कारने पटली मारत वनविभागाचे कुंपण ओलांडले. यावेळी जमावाने कारमधील अखिलेश संजय पवार, अर्णव अभिषेक कौल यांना मारहाण केली तर धु्रव निलेश सोनवणे पळण्यात यशस्वी झाला. संशयीताना जमाव मारहाण करीत असताना क्यूआरटी पथकाने त्यांची सोडवणूक केल्याचा राग जमावाला आल्यानंतर त्यांनी दगडफेक केल्याने दोन पोलीस जखमी झाले.


कॉपी करू नका.