घसरत्या केळी भावामुळे निंभोर्‍यातील शेतकर्‍याने उचलले टोकाचे पाऊल

0

Nimbhora farmer took extreme step due to falling banana price निंभोरा : केळी पट्ट्यात केळीचे बाजारभाव दररोज घसरत असल्याने व पाचशे रुपयापर्यंत केळीचे बाजारभाव आल्याने या नैराश्यातून निंभोर्‍यातील तरुण शेतकर्‍याने सोमवार, 6 रोजी भल्या पहाटे स्वतःच्या शेतात दोरीचा गळफास घेऊन आत्महत्या केली. हर्षल रवींद्र नेहेते (38, निंभोरा, ता.रावेर) असे मयताचे नाव आहे.

झाडाला आवळला गळफास
हर्षल हा तरुण सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान आपल्या दसनूर रस्त्यावरील शेतात पोहोचला व त्या ठिकाणी रामफळाच्या झाडाला दोरी बांधून त्याने गळफास लावून घेतला. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून केळीच्या घसरलेल्या भावाला कंटाळून वारंवार अनेक जणांकडे शेतकर्‍याने बाजारभाव कमी असल्याबद्दलची खंत व्यक्त केली असल्याची चर्चा गावात होती. या कारणावरूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा कयास गावात व्यक्त केला जात आहे. हर्षल नेहेते हा तरुण मनमिळाऊ स्वभावाचा व कष्टकरी शेतकरी असल्यामुळे त्याच्याविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी हरिष नेहेते यांच्या खबरीवरून निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अविनाश पाटील करीत आहेत.


कॉपी करू नका.