मी व गिरीश भाऊ बेरर चेक : भुसावळातील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावणार !

भुसावळात देवेंद्र फडणवीसांची ग्वाही : खासदार रक्षा खडसे यांना एक लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आणण्याचे आवाहन

0

Me and Girish Bhau Berar Check: All the pending works in Bhusawal will be cleared! भुसावळ : मी व गिरीशभाऊ महाजन हे बेरर चेक असून आमदार संजय सावकारे यांनी सांगितलेली सर्व कामे आपण मार्गी लावणार असल्याची ग्वाही भुसावळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मातृभूमी चौकात जाहीर सभा मंगळवारी रात्री नऊ वाजता झाली. याप्रसंगी ते बोलत होते. भुसावळातील अमृत योजनेसह एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र, बस पोर्ट, एमआयडीसी, भुयारी गटारी या विषयांना आगामी अधिवेशनात निधी देवून सर्व प्रश्न सोडवणार असल्याचे फडणवीस यांनी सांगून आमदार संजय सावकारे यांच्या कार्याचे कौतुक केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी आमदार चैनसुख संचेती, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, रिपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, उद्योजक मनोज बियाणी, रजनी सावकारे, डॉ.केतकी पाटील, राजेंद्र फडके, रंजना महाजन, जयप्रकाश बाविस्कर, मोहन फालक, नंदू महाजन आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधकांकडे केवळ इंजिन, डबे नाही
आपल्या आक्रमक शैलीत फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षांकडे 24 पक्षांची खिचडी आहे मात्र नेतृत्व नाही व केवळ त्यांच्याकडे इंजिन असून डबेच नाही मात्र देशात मजबूत महायुती असून कणखर हातात देशाचे नेतृत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा दहा वर्षात चौफेर विकास केला असून त्यांच्या कार्याने अर्थशास्त्रीदेखील चकीत झाले आहेत. 10 वर्षात 50 कोटी लोकांना गॅस देण्यात आला. 55 कोटी लोकांना शौचालय, 60 कोटी लोकांना शुद्ध पाणी, 62 कोटी युवकांना 10 लाखांचे मुद्रा लोण कुठल्याही गॅरंटीविना देण्यात आले असून आता त्याची मर्यादा 20 लाख रुपये करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. देशातील 80 लाख बचत गटांना आठ लाख कोटी दिल्याने तीन लाख महिला आता लखपती दीदी झाल्या असून आगामी काळात आणखी सात लाख दीदी लखपती होतील, असे ते म्हणाले. 2026 मध्ये 33 टक्के महिला आमदार होतील, असेही फडणवीस म्हणाले.

मी व गिरीशभाऊ बेरर चेक : सर्व कामे मार्गी लावणार
आमदार संजय सावकारे यांनी भाषणात भुसावळातील अनेक विषय प्रलंबित असल्याचे सांगितल्यानंतर फडणवीस यांनी मी व गिरीशभाऊ बेरर चेक असल्याचे सांगून आगामी अधिवेशनात सर्व विषय मार्गी लावण्याची ग्वाही देत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या कार्याचे कौतूक केले. भुसावळातील बस पोर्ट, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र, अमृत योजना व भूमिगत गटारीसाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यंदाचे मतदान भाजपाला नाही तर देशाला
फडणवीस म्हणाले की, काँग्रेस काळात पीएम लाचार होता मात्र मोदीजींच्या हातात नेतृत्व आल्यानंतर देश स्वाभिमानी झाला आहे. देशातच आता संरक्षण उत्पादने बनू लागली असून ती एक्सपोर्ट होवू लागली आहे. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारा आपला कणखर पंतप्रधान आहे त्यामुळे पाकिस्तानही आता मोदीजींची भीती वाटू लागली आहे. 2019 नंतर एकही बॉम्बस्फोट झाला नसल्याचे सांगून त्यांनी काँग्रेस काळात घडलेल्या बॉम्बस्फोटांचा पाढा वाचला. यावेळचे मतदान केवळ रक्षाताईंना नाही तर भारतासाठी असल्याचे सांगून त्यांनी भाजपाला मतदानाचे आवाहन केले. तुतारीची पिपाणी कशी करायची हे जनतेला ठावूक असल्याचेही ते म्हणाले.


कॉपी करू नका.