भुसावळातील अतिक्रमितांचा घरकूल प्रश्न सोडवणार : भुसावळात मंत्री गिरीश महाजनांची ग्वाही

0

The families of the encroached in Bhusawal will solve the problem: Bhusawal Minister Girish Mahajan’s testimony भुसावळ : भुसावळातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवल्यानंतर विस्थापीत झालेल्या रहिवाशांना अद्याप घरकुल मिळाले नसल्याने लवकरच हा तिढा सोडवण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री गिरीश महाजन यांनी भुसावळात दिली.खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मातृभूमी चौकात जाहीर सभा मंगळवारी रात्री नऊ वाजता झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

खासदारांना भुसावळातून एक लाखांचा लीड मिळणार
मंत्री महाजन म्हणाले की, खासदार रक्षा खडसे यांना एक लाखांचा लीड भुसावळकरांनी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. देश आता स्वयंपूर्ण झाला असून देशातच संरक्षण उत्पादने तयार होवून त्यांची निर्यात होत असल्याचे ते म्हणाले. सक्षम हातात देशाचे नेतृत्व असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करण्यासाठी खासदार रक्षाताई यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी आमदार चैनसुख संचेती, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, रिपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, उद्योजक मनोज बियाणी, रजनी सावकारे, डॉ.केतकी पाटील, राजेंद्र फडके, रंजना महाजन, जयप्रकाश बाविस्कर, मोहन फालक, नंदू महाजन आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.