500 वर्षानंतर रामलल्ला अयोध्येत विराजमान : आमदार संजय सावकारे

चुकीचे काम करणार्‍यांवर ईडीची कारवाई होणारच : भुसावळातील प्रलंबित प्रश्न सुटण्याची आशा

0

Ramlalla sitting in Ayodhya after 500 years : MLA Sanjay Savkare भुसावळ : काँग्रेस केवळ भाजपाकडून संविधान बदलले जाणार, अशा खोट्या वल्गना करून मतदारांची दिशाभूल करीत आहे मात्र सर्वात जास्त संविधानात बदल काँग्रेस काळात झाल्याचे भुसावळचे आमदार संजय सावकारे म्हणाले. ते म्हणाले की, सुमारे 500 वर्षानंतर रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले हे मोदी सरकारची मोठी उपलब्धी आहे. खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मातृभूमी चौकात जाहीर सभा मंगळवारी रात्री नऊ वाजता झाली. याप्रसंगी ते बोलत होते. भुसावळातील अमृत योजनेसह एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र, बस पोर्ट, एमआयडीसी, भुयारी गटारींंचा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून व्यक्त केली.

चुकीचे काम केल्यास ईडीची कारवाई होणारच
आमदार म्हणाले की, विरोधक नेहमीच ईडीवर टिका करतात मात्र जे चुकीचे करणार त्यांच्यावर कारवाई ही होणार असल्याचे आमदार म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून एक हजार कोटींची कामे झाल्याचे ते म्हणाले. 540 कोटींची वरणगाव-तळवेल योजना व अडीचशे कोटीतून रस्त्यांची कामे झाल्याचे त्यांनी सांगून भुसावळातील प्रलंबित प्रश्न सुटण्याची अपेक्षा फडणवीस यांच्याकडून व्यक्त केली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी आमदार चैनसुख संचेती, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, रिपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी सभापती राजेंद्र चौधरी, उद्योजक मनोज बियाणी, रजनी सावकारे, डॉ.केतकी पाटील, राजेंद्र फडके, रंजना महाजन, जयप्रकाश बाविस्कर, मोहन फालक, नंदू महाजन आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


कॉपी करू नका.