एलटीटी वाराणशी दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या धावणार !

0

Summer special trains will run between LTT Varanasi! भुसावळ : उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना झालेली प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाकडून एलटीटी ते वाराणशी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे गाडी चालविली जाणार आहे. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांची सोय होणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य तिलक टर्मिनस ते वाराणसी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी उन्हाळी विशेष गाडीच्या आठ फेर्‍या होतील.

8 मे पासून आरक्षण सुरू
04227 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 6 ते 27 मे या काळात दर सोमवारी दुपारी एक वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री 11.20 वाजता वाराणसीला पोहोचेल. या गाडीच्या चार फेर्‍या होतील तसेच 04228 विशेष गाडी वाराणसी येथून 4 ते 25 मे पर्यंत दर शनिवारी रात्री 10.20 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी सकाळी 10.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीच्या चार फेर्‍या होतील. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर, लखनऊ, अयोध्या कैंट, अयोध्या, शाहगंज आणि जौनपूर येथे थांबणार आहे. पहिल्या दिवशी 6 मेला सुटणारी गाडी विना आरक्षणाची धावणार आहे तर 8 मे पासून या गाडीचे आरक्षण सुरू होणार आहे.


कॉपी करू नका.