भुसावळातील वसंत टॉकीजचे सील न्यायालयाच्या आदेशाने काढले

0

Seals of Vasant Talkies in Bhusawal removed by court order भुसावळ : पालिका कराचा तब्बल 45 लाखांचा भरणा न केल्याने भुसावळ शहरातील वसंत टॉकीजला नगरपालिकेने सील लावले होते मात्र न्यायालयात या संदर्भात दाद मागण्यात आल्याने भुसावळ न्यायालयाच्या आदेशाने काढण्यात आले.

थकबाकी न भरल्याने लावले होते सील
भुसावळ नगरपालिकेच्या थकबाकी वसूल करणार्‍या पथकाने 13 मार्च 2024 रोजी वसंत टॉकीजला सील लावून कुलूप ठोकले होते. पालिका कराचा तब्बल 45 लाखांचा भरणा करण्यासंदर्भात हे सील लावण्यात आल्याने त्याविरोधात चंदनमल अ‍ॅण्ड कंपनीतर्फे विरेंद्र कुमार लुंकड या भागीदाराने भुसावळातील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात अ‍ॅड.नितीन खरे यांच्यामार्फत दावा दाखल करून दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने 4 मे 2024 रोजी नगरपालिकेने वसंत टॉकीजला लावलेले सील तीन दिवसात काढून घेण्याचे आदेश दिले.

नगरपालिकेने तीन दिवसात सील न काढल्यास वादी चंदनमल अ‍ॅण्ड कंपनीने सील कुलूप काढून टाकण्याचा आदेश न्यायालयाने दिला. बुधवार, 8 मे 2024 रोजी वादी चंदनमल अ‍ॅण्ड कंपनीतर्फे भागीदार विरेंद्रकुमार लुंकड यांनी नगरपालिकेला लावलेले सील व कुलूप काढून टाकलेले आहे. वसंत टॉकीज आता पूर्ववत सुरू झाल्याने प्रेक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चंदनमल अ‍ॅण्ड कंपनीतर्फे अ‍ॅड.नितीन खरे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.


कॉपी करू नका.