भुसावळात उद्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ प्रचार दौरा

0

भुसावळ : भारतीय जनता पार्टी महायुतीच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 24 मध्ये भुसावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 24 मधील गुरुनानक ऑटोमोबाईलच्या मागे, रमण नेमाडे यांच्या डेअरीजवळपासून सकाळी नऊ वाजता प्रचार दौर्‍याला सुरूवात होणार आहे

पदाधिकार्‍यांना सहभागाचे आवाहन
प्रचारात भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, शहराध्यक्ष युवराज लोणारी, बूथ विस्तारक रमाशंकर दुबे, सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे यांनी केले आहे.


कॉपी करू नका.