दिड लाखांची लाच भोवली : नाशिक पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकासह संचालक एसीबीच्या जाळ्यात

0

Bribe of half a lakh: Assistant Director of Nashik Archeology Department along with Director in ACB’s net नाशिक : तक्रारदाराला कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभाग, नाशिक यांचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडीअंती दिड लाखांची लाच मागून ती स्वीकारताना नाशिक पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे (41, रा. फ्लॅट नंबर 17, ए विंग,अनमोल नयनतारा, रानेनगर, नाशिक) व संचालक तेजस मदन गर्गे (रा.इमारत क्र.6 फ्लॅट न.20,लाला कॉलेज जवळ, महालक्ष्मी रेसकोर्सजवळ, मुंबई) यांना नाशिक एसीबीने अटक केली.

असे आहे लाच प्रकरण
32 वर्षीय तक्रारदाराला कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने ते देण्यासाठी सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांनी सोमवार, 6 मे रोजी दिड लाख रुपये लाच मागितली. तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर व लाच हिश्याचे पैसे स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने संचालक तेजस मदन गर्गे यांनाही अटक करण्यात आली. आरोपींविरोधात इंदिरानगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.बी.सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे, पोलीस हवालदार सचिन गोसावी, पोलीस नाईक अविनाश पवार आदींनी हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.