भुसावळातील प्रभाग 24 मध्ये आज भाजपाचा प्रचार दौरा

आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात निघणार प्रचार रॅली

0

भुसावळ : भारतीय जनता पार्टी महायुतीच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 24 मध्ये भुसावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार दौरा गुुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे.

पदाधिकार्‍यांना उपस्थिती
प्रचार रॅलीत भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, शहराध्यक्ष युवराज लोणारी, बूथ विस्तारक रमाशंकर दुबे, सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयसभ इंगळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे यांनी केले आहे.

भुसावळातील प्रभाग क्रमांक 24 मधील माजी नगरसेवक बापू महाजन यांच्या निवासस्थानाजवळील शिव कॉलनी भागातून सायंकाळी पाच वाजता प्रचार रॅलीला सुरूवात होणार आहे.


कॉपी करू नका.