श्रीराम पाटील यांना प्रचंड मताधिक्क्यांनी विजयी करणार !

भुसावळातील कार्यकर्त्यांचा निर्धार : भुसावळातील खडका रोड भागात निघाली प्रचार रॅली

0

भुसावळ : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभेतून प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार भुसावळातील कार्यकर्त्यांनी गुरुवारी व्यक्त केला. गुरुवारी सकाळी शहरातील अमरदीप टॉकीज, खडका रोड, नसरवांजी फाईल, आगाखान वाडा, शिवाजी नगर, जाम मोहल्ला भागातून कार्यकर्त्यांनी प्रचार रॅली काढली.

यांचा प्रचार रॅलीत सहभाग
प्रचार रॅलीत काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मुन्वर खान, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर. कॉँग्रेस शहराध्यक्ष रवींद्र निकम, महिला शहराध्यक्ष यास्मीन बानो, जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब खान, मुस्लीम लीगचे रऊफ ठेकेदार, नावा पहेलवान, जुनेद खान, मुक्तार मेंबर, सलीम मेंबर, माजी नगरसेवक साबीर शेख, आरीफ खंजाची, सोहेल पठाण, सिकंदर खान आदींची उपस्थिती होती.

 


कॉपी करू नका.