जळगावात हवेत गोळीबार करून दहशत : आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

0

Terror by shooting in the air in Jalgaon : Accused in police net जळगाव : जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात बुधवार, 8 मे रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास एकाने जुन्या वादातून हवेत दोन राऊंड फायर केले. पोलिसांनी अवघ्या पाच तासात संशयीत अस्लम भिकन शेख ऊर्फ बाबुराव (24, रा.गेंदालाल मिल, जळगाव) यास नशिराबाद येथून अटक केली

बॅनरवरून वाद : हवेत केले फायरींग
गेंदालाल मिल परिसरात राहणार्‍या अली सैय्यद रज्जाक यांचा मुलगा काशिम याच्यासोबत रविवार, 5 मे रोजी रात्री संदल कार्यक्रम संपल्यावर संशयीत आरोपी अस्लम याच्याशी बॅनरवर नाव टाकण्यावरून वाद झाला होता. बुधवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास अस्लम भिकन शेख ऊर्फ बाबुराव हा त्यांच्या घरासमोर आला. जुन्या वादातून त्याने शिवीगाळ करीत दगडफेक सुरू केली. आवाज आणि गोंधळाने अली सैय्यद रज्जाक परिवारासह बाहेर आले. घराबाहेर उभ्या असलेल्या अस्लम याने शिवीगाळ करीत हवेत गावठी पिस्तूलने 2 राऊंड फायर केले. बुधवारी सकाळी याप्रकरणी अली सैय्यद रज्जाक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

नशिराबाद येथून आरोपीला अटक
शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव शिरसगर, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, भास्कर ठाकरे, सुधीर सावळे, योगेश पाटील, अमोल ठाकूर आदींनी नशिराबाद उड्डाणपूलखालून संशयित असलम शेख याला अटक केली.त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

 


कॉपी करू नका.