खासदार रक्षाताई खडसे यांच्या विजयासाठी मंत्री गिरीश महाजनांनी लावली ताकद

जामनेर तालुक्यात प्रचाराचा झंझावात : खासदार रक्षाताईंना निवडून देण्याचे आवाहन

0

जामनेर : रावेर लोकसभा महायुतीतील भाजपा उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या विजयासाठी भाजपा नेते व मंत्री गिरीष महाजन यांनी ताकद लावली आहे. पायाला भिंगरी लावून गिरीशभाऊ यांनी ताईंच्या प्रचारात झोकून देत प्रचार रॅलीत सहभाग वाढवला आहे. जामनेर तालुक्यातून सर्वात जास्त मताधिक्य ताईंना मिळवून देवू, असे आश्वासन महाजन यांनी दिले आहे. गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत मतदारसंघात प्रचार दौरा करण्यात आला. मतदारांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भाजपाला मतदानाचे आवाहन
सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भाजपा नेते मंत्री गिरीष महाजन व नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्यासह जामनेर शहर व तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकार्‍यांना सोबत जामनेर शहर प्रचारार्थ भेटी दिली. यावेळी मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले.


कॉपी करू नका.